हैदराबाद अत्याचार प्रकरणी चोपड्यात जन आक्रोश मोर्चा

dr priyanka

 

चोपडा प्रतिनिधी । हैदराबाद येथील डॉ. प्रियंका रेड्डी सामूहिक अत्याचार व हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ महात्मा गांधी शिक्षण मंडळ, चोपडा संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, नर्सिंग काँलेज, अध्यापक विद्यालय, आँक्सफर्ड स्कूल, तंत्रनिकेतन, फार्मसी, आयटीआय तसेच कस्तुरबा महिला समाज संलग्नित विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शहरात जन आक्रोश मोर्चा काढून तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले.

याबाबत अधिक महिती अशी की, हैद्राबाद येथे दि.२७ नोव्हेंबर रोजी डॉ. प्रियंका रेड्डी या भगिनीवर झालेल्या अमानवीय व अतिशय क्रुर अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिंनी, महिला शिक्षक, महिला कर्मचारी सामील झाले. या अमानवी क्रुत्यात सहभागी नराधमांना तात्काळ शिक्षा देऊन डॉ. प्रियंका रेड्डी यांना व तिच्या कुटुंबाला न्याय द्यावा आणि समाजात, देशात न्यायव्यवस्था महिला वर्गाची सुरक्षा करण्यासाठी सक्षम आहे. याची शाश्वती द्यावी, तसेच जगभरात प्रसिद्ध असलेल्या महान भारतीय संस्कृतीत सन्मानाचे स्थान असणाऱ्या महिलांना तेवढ्याच सन्मानाने व सुरक्षित भयमुक्त जगता यावे, यासाठी येथील तहसीलदार अनिल गावीत व पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना निवेदन देण्यात आले.

शहरातील या भागातून निघाला मोर्चा
हा जन आक्रोश मोर्चा कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मेन रोड मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी कविता बोरसे, अनघा पाटील या विद्यार्थिनींनी, प्राचार्या रेखा पाटील, डॉ. शैलेश वाघ, प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी यांनी जन आक्रोश मोर्चास संबोधित केले व जनतेच्या मनातील आक्रोश काय आहे हे सांगितले. प्रा.माया शिंदे यांनी या जन आक्रोश आंदोलनाचे निवेदन कथन केले.

मोर्चा यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम
मोर्चा यशस्वीतेसाठी डॉ.आर.आर. पाटील, डॉ.शैलेश वाघ, प्रा.ए.बी. सूर्यवंशी, प्रा.विशाल पाटील, प्रा.व्ही.डी.शिंदे, प्रा.भूषण पवार, प्रा.दिपक करंकाळ, प्रा.अभिजीत साळुंखे, माया शिंदे, संगिता पाटील, डॉ.पी.एम.रावतोळे, सुनिता पाटील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मोर्चात विविध शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.

Protected Content