जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जाहीर व्याख्यान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागातर्फे जागतिक मानिसक आरोग्य दिनानिमित्त जाहीर व्याख्यान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाच्या सोहम योग हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात मानसोपचार तज्ज्ञा भाग्यश्री अडूलकर (मुंबई) यांचे ‘सोशल मिडीया आणि मानिसक आरोग्य ‘ या विषयावरील जाहीर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी त्यांनी सोशल मिडीयामुळे आपला मानसिकतेवर काय परिणाम होतो त्याचे दुष्परिणाम आणि मानसिक आजारातून बाहेर पडण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी योगासोबतच आणखी दैनंदिन काय उपाययोजना करण्यात येवू शकतात याविषयी मार्गदर्शन करून उपस्थितांच्या प्रश्नांचे समाधानही केले.

यावेळी मांचावर डॉ. देवानंद सोनार संचालक, सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, प्रा. अनंत महाजन नॅचरोपॅथी समन्यवयक आदी उपस्थित होते. डॉ. देवानंद सोनार यांनी प्रास्ताविकातुन जागतिक मानिसक आरोग्य दिनाचे महत्व आणि त्यादृष्टीने योग विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. ज्योती वाघ यांनी तर आभार प्रा. गीतांजली भंगाळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला.

Protected Content