जळगावात जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन द्वारा जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे दि. १० आणि ११ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

नॅशनल योगासन स्पोर्टस फेडरेशनद्वारा तिसरी नॅशनल योगासन स्पोर्टस चॅम्पियनशिप नोव्हेंबर महिन्यात आयोजित होणार आहे. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या राजस्तरीय योगासन संघाची निवड सप्टेंबर – २०२२  महिन्यात केली जाणार आहे. त्या अनुषंगाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपली जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेतून राज्य संघात निवड होणे गरजेचे आहे. त्या हेतूने जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन द्वारा जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा दि. १० आणि ११ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

हि स्पर्धा सब ज्युनियर गट वय वर्ष ९ ते १४, ज्युनियर गट वय वर्ष १४ ते १८ आणि सीनियर गट वय  वर्ष १८ पेक्षा वरील अशा तीन गटांमध्ये मुले आणि मुली अशी वेगवेगळी आयोजित केली जाणार आहे. त्यामध्ये प्रत्येक गटामध्ये स्पर्धेच्या चार प्रकारांपैकी स्पर्धकांना कोणत्याही एका किंवा एकापेक्षा अधिक प्रकारामध्ये  सहभागी होता येणार आहे. स्पर्धा प्रकार, नियमावली आणि स्पर्धेचा अभ्यासक्रम https://yogasanasport.in/ या लिंक वरून डाऊनलोड करता येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धेच्या दोन दिवस आधी पुढील लिंक वरून नोंदणी करणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी लिंक https://forms.gle/TFLAt3UnHNG2VmvFA.

स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवर स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. स्पर्धा मू.जे.महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी येथे सकाळी ९ वाजेपासून आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी ७२७६७७५१०१, ८०८०१०४३१७ या क्रमांकावर संपर्क साधून स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री. सतीश मोहगावकर, डॉ. देवानंद सोनार, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, प्रा. पंकज खाजबागे  यांनी केले आहे.

Protected Content