पारोळा शहरासह तालुक्यात मतदानाबाबत जनजागृती

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| तालुक्यामध्ये शहरामध्ये मतदार जनजागृती म्हणून जवळपास एक महिन्यापासून ११४ गावांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

पारोळा शहरासह ग्रामीण भागामध्ये डेमो म्हणून मतदान मशीन ने ग्रामीण भागामध्ये मतदान कसे करावे याविषयी डेमो मशीन द्वारा दाखवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सर्व ग्रामीण भागातील तलाठी आप्पा दाखवत आहे.

या अनुषंगाने आज सायंकाळी साडेतीन वाजेला आझाद चौकामध्ये पारोळा शहर तलाठी निशिकांत माने यांनी मतदारांना डेमो मतदान कसं करावं याविषयी मतदान करून दाखवले व सविस्तर महिला व पुरुषांना समजावून सांगितले यावेळी शहर तलाठी निशिकांत माने, जगन्नाथ वाणी, अशोक चौधरी, अतुल वैष्णव, उमेश , चौधरी व निखिल पवार, योगेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content