बहादरपूर येथे शार्टसर्किटमुळे घराला आग; संसारोपयोगी वस्तूसह 10 लाखांचे नुकसान

jalun khak news

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील बहादरपूर येथे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे राहत्या लाकडी घराला आग लागून रोख रक्कम, कपडे आणि संसारोपयोगी वस्तूसह 10 लाख रूपयांचे नुकसान झाल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेत मोरे कुटुंबियांचा संसार उघड्यावर आला आहे.

याबाबत माहिती अशी की, विजय गोविंद मोरे हे आपल्या कुटुंबासह भाऊबंदकीकडे नवरात्र दुर्गादेवीची आरती करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावलेले होते. दोन तासानंतर अचानक घरातून धुर निघाल्याचे शेजारचांच्या लक्षात आल्याने तातडीने विजय मोरे यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली. तत्काळ त्यांनी घराकडे धाव घेतली असता घरात अग्नीतांडव सुरू होता. त्यात सर्व घरातील कपडे, रोख रक्कम आणि संसार उपयोगी वस्तू डोळ्यादेखत जळत होत्या. गावकऱ्यांनी तातडीने घराकडे धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीमुळे क्षणात होत्याचे नव्हते असे झाले. दरम्यान तरूणांच्या मदतीन घरात भरलेले गॅसचे सिलेंडर बाहेर काढण्यात आले होते.

आपल्या उदरनिर्वाहाच्या व्यवसाय म्हणजेच सेतू सुविधा केंद्र चांगल्या अद्यावत करण्यासाठी त्यांनी त्यांच्याजवळची वडीलोपार्जीत शेती विकली होती. त्या जमिनीचे पैसे आणि बँकेतून 2 लाख 30 हजार वेगळे घरात काढून ठेवलेले होते. 7 ते 8 लाख रुपये रोख रक्कम सोने कपडे इतर संसार उपयोगी वस्तू असे जवळजवळ 10 लाख रुपयांचे नुकसान झाले. त्या घरात त्याची आई, भाऊ, वहिनी, पत्नी, मूलबाळ अशी राहत होती. सुदैवाने नवरात्र उत्सवाचे कार्यक्रमानिमित्त ते बाहेर गेल्याने जीवितहानी मात्र झाली नाही

शेती विकलेली गेली वाया; आईने फोडला हंबरडा
राहते घर चांगलं करावं नेहमीच पावसाळ्यात गळणारे घराला ते त्रासून गेले होते. म्हणून आई आणि भाऊच्या पूर्वसंमतीने विजय मोरे आपली शेती विकली. सेतू सुविधा केंद्र गावात सुरू करून आपला उदरनिर्वाह त्याच्यावर तो सुरू ठेवला होता, मात्र घराला लागलेली आग पाहूनच त्याच्या आईने हंबरडा फोडला आणि शेती विकून आलेले पैसे वाया गेल्याने आईचे रडणे मात्र थांबत नव्हते. बँकेतून चालू करून आणले. दोन लाख 30 हजार रुपये जवळजवळ एक राख झाले होते. सुदैवाने त्यातील काही पैसे वाचण्यात गावकऱ्यांना यश आले मात्र सर्वच नोटा या आगीने भाजल्या गेल्यामुळे निकामी झाले आहेत. सदर घटनास्थळी तलाठी सर्कल तसेच वीज वितरण कंपनीचे इंजिनिअर्स यांनी पंचनामा करून घेतला.

Protected Content