संशयास्पदपणे फिरणार्‍यांवर प्रतिबंधात्मक कारवाई

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातून संशयास्पदपणे फिरणार्‍यांवर पारोळा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

शहरासह तालुक्यात अलीकडच्या काळात चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून तीन दिवसांपूर्वी भर दिवसा दोन चोर्‍या झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमिवर, पोलीस प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. दरम्यान, भर दिवसा बुधवारी दुपारी शहरातून काही जण संशयास्पदरित्या फिरतांना पोलिसांना आढळून आले. त्यांची विचारपूस केली असता त्या सर्वांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली.

यामुळे पोलिसांनी गणेश शंकर चव्हाण (वय २६, रा. कसबे, ता.जामनेर), दादाराव किसन चितोडे (रा. अंबड, जि.जालना), काज्या अनाज्या वासकले, तेवज्या बाक्या वासले, कमल दुकान्या वासले, राण्या रामसिंग वासले, अनिल कटुल्या वासले (रा.सर्व रा.रसमल, ता.पाटी, जि.बडवानी),संजय गुलाब शेमले (रा.गोलपाणी, ता.पाटी, जि.बडवानी), सोहज्या रामसिंग वासले आणि दिनेश सुकलाल वासले या ११ जणांना ताब्यात घेतलो. सर्वांवर कलम १०९ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करून, सर्वांना तहसीलदार गवांदे यांच्यासमोर हजर केले. या सर्व संशयितांची माहिती त्यांच्या राहत्या पत्त्यावरील पोलिस स्टेशनला कळवली आहे. तसेच गुन्हेगारी रेकॉर्ड मागवले आहे. या तपासातून त्यांचा अलीकडच्या काळातील गुन्हेगारी कृत्यांमध्ये हात आहे का ? याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल, उपनिरीक्षक राजू जाधव, हेड कॉन्स्टेबल महेंद्र मराठे, इकबाल शेख, जावेद शेख, संदीप सातपुते, किशोर भोई, अभिजित पाटील व आशिष गायकवाड यांच्या पथकाने केली.

Protected Content