जामनरे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बदलापूर येथे दोन लहान शाळकरी मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशी द्या, महिलावर अत्याचार वाढत चालले असून निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट, शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस तर्फे आज तहसील कार्यालयासमोर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले व यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे स्थानिक नेते दिगंबर पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, तालुका अध्यक्ष किशोर पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष ॲड. ज्ञानेश्वर बोरसे, दीपक राजपूत, काँग्रेसचे नेते एस. टी .पाटील, तालुका अध्यक्ष शंकर राजपूत, डॉ. ऐश्वर्या राठोड, अनिल बोहरा, दिलीप पाटील, विश्वजीत पाटील, प्रल्हाद बोरसे, कळमसरा सरपंच अशोक चौधरी, मूलचंद नाईक, निर्मला शिंदे, प्रमिला पवार, नंदिनी चव्हाण, विमल चौधरी, दिपाली पाटील, वैशाली पाटील, रत्ना सुरळकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर राजपूत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, डॉ. ऐश्वरी राठोड, शिवसेना तालुकाध्यक्ष ॲड. ज्ञानेश्वर बोरसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.