यावल येथे ठाकरे गटातर्फे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचा निषेध

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | १० जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना (शिंदे गटा) च्या १६ आमदार अपात्रतेबाबतचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने दिला असा अनपेक्षीत निकाल दिल्याने उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावल शहरातील भुसावळ टी पाँईट या चौकात सायंकाळच्या सुमारास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात पक्षपाती निर्णय दिल्याने त्यांच्या प्रतिकात्मक फलकावर जोडे मारत त्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करीत फलक जाळले.

या प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचे जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी, तालुका उपप्रमुख शरद कोळी, यावल शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, शहर उपप्रमुख संतोष धोबी, आदिवासी सेनेचे हुसैन तडवी ईस्माईल, विनोद पाटील, एल.व्ही. पाटील, शिवाजी पाटील, शुभम गोतमारे, योगेश चौधरी, सुनिल बारी, योगेश पाटील, आर के चौधरी, डॉ विवेक अडकमोल, प्रल्हाद बारी, पिंटु कुंभार, शिवाजी पाटील, हेमन्त पाटील, सागर देवांग, सचिन कोळी, भाऊसाहेब धनगर, संतोष वाघ, नारायण फेगडे यांच्यासह सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

Protected Content