यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचा “खान्देश ऑफ द इअर” पुरस्काराने सन्मानित

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या यावल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचा सप्तरंग मराठी चॅनल व कर्तव्य बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात खान्देश ऑफ द ईअर या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

जळगाव एमआयडीसी येथील प्रसिद्ध हॉटेल सेन्टर फॉरसिजन कॉटेजच्या सभागृहात सप्तरंग मराठी चॅनल व कर्तव्य बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रविवार ९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी मराठी सिनेसृष्टीची प्रसिद्धी अभिवेत्री भार्गवी चिरमुले , जळगाव जिल्हा लायर्स ग्राहक संस्थेचे अध्यक्ष अॅड संजय राणे, सुप्रसिद्ध कॅन्सर रोगतज्ञ डॉ. निलेश चांडक, डॉ.पी.आर. चौधरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रात आपल्या उल्लेखनिय कार्याचा ठसा उमटविणाऱ्या सुमारे २७ जणांना यावेळी २o२३ या वर्षाच्या खान्देश ऑफ द इअर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यात यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष तथा समाजसेवक अतुल वसंत पाटिल यांना सपत्नीक या पुरस्काराने मराठी सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्याहस्ते सत्मानपत्र देवुन गौरवविण्यात आले. त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, हाजी फारूख शेख, पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील, माजी उपनराध्यक्ष असलम शेख नबी, माजी नगरसेवक समीर शेख मोमीन ,गणेश महाजन ,एजाज देशमुख ,एम बी तडवी, प्रशांत पाटील, डी.बी. पाटील, अय्युब पटेल, सुनिल गावडे, भारत कोळी आदींनी शुभेच्छा दिल्या.

Protected Content