महापालिका मालकीच्या जागेवरील संस्थामध्ये महापौर, आयुक्त यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील विविध प्रभागात महापालिका मालकीच्या जागा विकासासाठी सामाजिक संस्थांना दिलेल्या आहेत. या संस्थाना त्या जागेवर शाळा, दवाखाने, ग्रंथालये, वाचनालये आदीसाठी विकसित करण्यासाठी देण्यात आले आहेत. मात्र या जागांचा वापर व्यावसायिक पद्धतीने होत असल्याचे समोर आल्याने अशा जागांचा गैरवापर रोखण्यासाठी अशासकीय प्रस्ताव भाजपा गटनेते भगत बालाणी हे गुरुवार २९ ऑगस्ट रोजी महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या महासभेत मांडणार आहेत.

बालाणी यांनी प्रस्तावात महापौर व आयुक्त यांना खुले भूखंड दिलेल्या संस्थेच्या कार्यकारणीत पदसिद्ध अधिकारी म्हणून नेमणूक करावी अशी मागणी केली आहे. शहरातील अनेक खुल्या भूखंडाचा वापर हा व्यावसायिक पद्धतीने केला जात आहे. त्यावर १० टक्के बांधकाम करण्याचे बंधन असताना, त्यापेक्षा जास्त क्षेत्रफळ बांधकामाने व्यापले आहे. त्यामुळे त्या जागेच्या परिसरातील नागरिकांच्या हक्काची जागा हिरावली गेली आहे. मनपा संचलित संस्थाच्या जागेत प्रवेश परिसर, दर्शनी स्पष्ट जळगाव शहर महापालिकेचा उल्लेख करणे, कार्यकारणीचा तपशील, नागरिकांनी नाममात्र दारात सेवा आदी सूचना केल्या आहेत. यासोबतच प्रशासकीय ९ प्रस्ताव व इतर दुसरा एक अशासकीय प्रस्ताव असे एकूण ११ प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत.

Protected Content