Home Cities बोदवड जागृत मरीमाता देवस्थानात महापूजेची सांगता

जागृत मरीमाता देवस्थानात महापूजेची सांगता

0
101


bodwad mandir

बोदवड, वृत्तसंस्था | शहरातील मलकापूर रस्त्यावरील जागृत मरीमाता देवस्थान शैक्षणिक सांस्कृतिक ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित महापूजेची नुकतीच महाप्रसादाने उत्साहात सांगता करण्यात आली.

 

यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला. मरीमाता देवस्थानतर्फे दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक व पूजारी देविदास धनु राखोंडे करीत असतात. हा कार्यक्रम परंपरेनुसार १०० वर्षांपासून श्रावण महिन्यामध्ये घेतला जातो. त्याचप्रमाणे सदर संस्थेमार्फत वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमही देवस्थान परिसरात राबवले जात असतात.


Protected Content

Play sound