प्रचार संपला : आता लक्ष मतदानाकडे !

Electronic voting machine

जळगाव, प्रतिनिधी | राज्य विधानसभा निवडणूकीचा प्रचार आज सायंकाळी समाप्त झाला असून आता सगळ्यांचे लक्ष सोमवारी होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघात ही निवडणूक होत असून यावेळी बदललेल्या काही समीकरणांमुळे ती गाजण्याची आणि वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

 

या ११ विधानसभा मतदार संघातून १०० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, एम.आय.एम., मनसे यांच्यासह अनेक अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये काही ठिकाणी अपक्षांनी मुख्य पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे. त्यातही मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण, चोपडा, जामनेर, रावेर या मतदार संघातील लढती अधिक लक्षवेधी आहेत. त्याचवेळी जळगाव शहर, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा येथे मामला एकतर्फी वाटतोय तर अमळनेर आणि एरंडोल येथे चित्र अस्पष्ट दिसते आहे.  जिल्ह्यात एकूण ३४ लाख ५३ हजार ०६२ एवढे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये १७ लाख ९९ हजार १४८ पुरुष तर १६ लाख ५३ हजार ८२४ महिला आणि ९० इतर मतदार आहेत.

Protected Content