बंद घर फोडून ४१ हजारांचा ऐवज लांबविला

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बंद घराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत ४१ हजार रूपये किंमतीचे सोन्याच्या दागिने चोरून नेण्याची घटना शहरातील अयोध्या नगर जवळील रामचंद्र नगरात उघडकीला आली आहे. याप्रकरणी मंगळवारी १ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नरेंद्र मानसिंग पाटील (वय-३२) रा.  रामचंद्र नगर, आयोध्या नगरजवळ जळगाव हे व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. ३१ जुलै सकाळी ९ वाजता  ते १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद होते. याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तू असा एकुण ४१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना उघडतील आल्यानंतर नरेंद्र पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी १ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहे.

Protected Content