Home Cities मुक्ताईनगर आमदार निधीतून जे.ई. स्कूल मुक्ताईनगरला प्रोजेक्टरची भेट 

आमदार निधीतून जे.ई. स्कूल मुक्ताईनगरला प्रोजेक्टरची भेट 

0
6

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील जे.ई. स्कूलमध्ये नाशिक विभागाचे लोकप्रिय शिक्षक आमदार किशोरजी दराडे यांच्या आमदार निधीतून आधुनिक प्रोजेक्टर भेट देण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यालयातील डिजिटल शिक्षणाला चालना मिळणार असून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा अधिक प्रभावी लाभ मिळणार आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी एस. बी. वंजारी यांनी प्रास्ताविकातून प्रोजेक्टरसारख्या आधुनिक शैक्षणिक साधनांमुळे अध्यापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. यानंतर शिक्षक आमदार किशोरजी दराडे यांचे स्वीय सहाय्यक हरीषजी मुंडे, माजी जिल्हा मध्यवर्ती शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष आप्पासाहेब संभाजीराव पाटील, घुगे सर, शिक्षक सेनेचे जिल्हा सरचिटणीस महेंद्र पाटील तसेच मुक्ताईनगर तालुका समन्वयक सुनील आवटे यांचे विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एम. चौधरी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विद्यालयाच्या उपप्राचार्या व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक व्ही. डी. बऱ्हाटे, के. आर. कवळे, एस. एम. वाढे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यालयाला प्रोजेक्टर सुपूर्द करण्यात आला. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शिक्षक आमदार किशोरजी दराडे यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना अद्ययावत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपण आणि आपली संपूर्ण टीम कायम कार्यरत असून शिक्षकांच्या हितासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी आप्पासाहेब संभाजीराव पाटील यांनीही शिक्षकांना मार्गदर्शन करत शिक्षण क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. शाळांमध्ये आधुनिक शैक्षणिक साधने उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत अधिक परिणामकारकता येईल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी एस. बी. वंजारी यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद आणि सर्वांचे आभार मानले. विद्यालयाला मिळालेल्या या प्रोजेक्टरमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आधुनिक अध्यापन पद्धतींचा अधिक प्रभावी वापर होणार असल्याने शिक्षक आणि पालकांनी समाधान व्यक्त केले.


Protected Content

Play sound