ठाणे,मुंबई लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – भोंगे अथवा तत्सम साहित्य खरेदी करणाऱ्याची विक्रेते व दुकानदारांनी माहिती घेत जवळच्या पोलीस ठाण्यात नोंद करावी. तसेच २७ जून पर्यत धार्मिक परिसरात जमावबंदी, रॅली, मिरवणुका काढण्यास ठाणे पोलीसानी निर्देश दिले आहेत.
राज्यात विविध धार्मिक स्थळावरील भोंग्यावर वादाच्या या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा पोलीस आयुक्त क्षेत्रात सर्व ध्वनिक्षेपक यंत्र वा अन्य साहित्य विक्रेते, दुकानदार यांनी ज्या ग्राहकाने ध्वनिक्षेपक वा अन्य साहित्य खरेदी केले असेल त्यांची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात देण्याचे बंधनकारक असल्याचे निर्देश पोलीस उपायुक्त डॉ.सुधाकर पठारे यांनी दिले आहेत.
दरम्यान ठाणे शहर अथवा अन्य परिसर क्षेत्रात २७ जून पर्यंत विनापरवानगी वाद्य वाजंत्री वाजविणे, सभा, मेळावे, मिरवणूक घेण्यावर बंदी असून याबाबत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी ध्वनिक्षेपक वा अन्य साहित्य खरेदी करणाऱ्यांचा पत्ता, आधार, वीज देयक अथवा मोबाईल क्रमांक, साहित्य संख्या आणि कशासाठी खरेदी केले, आदी माहिती नोंद घेऊन सविस्तर माहिती विक्रेत्यांनी ठाणे स्थानिक पोलिसांना देण्याचे बंधनकारक असल्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे म्हटले आहे.