संत सावता माळी युवक संघाच्या विभागीय संपर्क प्रमुखपदी समाधान माळी यांची निवड

चोपडा (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते समाधान प्रभाकर माळी यांची संत सावता माळी युवक संघाच्या खान्देश विभागीय संपर्क प्रमुखपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

 

श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य ही युवा संघटना अवघ्या महाराष्ट्रभर आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात या संघटनेचे कार्यकर्ते काम करत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आणि आचार यांच्यावर संघटनेचे मूलतत्त्वे आधारलेली आहेत. ज्योतिबांचे कार्य, त्यांचे विचार, त्यांचे साहित्य जनसामान्यांना वाचायला मिळावे, त्याचे कार्य लोकांपर्यत पोहचावे यासाठी संघटना काम करत आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान देण्यात यावा यासाठी युवक संघ सातत्याने पाठपुरावा करत आहे. प्रत्येक वर्षी 11 मे महात्मा दिन प्रशासकीय स्तरावरून साजरा करण्यात यावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शासकीय कार्यालयात तसेच मुख्यमंत्री व इतर विभागीय मंत्री महोदय यांना निवेदन दिले जाते. विविध सामाजिक उपक्रम अवघ्या महाराष्ट्र भर सुरू असतात.
महाराष्ट्रात सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, साहित्य, कृषी, राजकीय, कला आशा विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्वाचा श्री संत सावता माळी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. समाजाला नवी दिशा आणि युवकांना प्रोत्साहन देऊन त्यांना मार्गदर्शन करत नव्या आचार, विचारांचा, नवा प्रेरणादायी समाज घडविण्यासाठी काम केले जात आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये युवकांसाठी असलेल्या संधीपासून त्यांना अवगत केले जाते आणि त्यांना नोकरी, व्यावसायासाठी प्रोत्साहन दिले जाते. भरकटलेल्या विचारांना दिशा देण्याचे काम आज श्री संत सावता माळी युवक संघ मोठ्या जोमाने करत आहे.

चोपडा येथील समाधान प्रभाकर माळी यांची नुकतीच श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य खान्देश विभागीय संपर्क प्रमुखपदी निवड झाली आहे. त्यांचे अभिनंदन युवक संघाच्यावतीने चोपडा धरणगाव, एरंडोल, रावेर, जामनेर, धुळे, नंदुरबार, शिंदखेडा शहर कार्यकारणी व तालुका कार्यकारिणीचा वतीने सत्कार सोहळा करण्यात आला. श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्यात. प्रमुख उपस्थिती विभागीय उपाध्यक्ष लक्ष्मण महाजन, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश लहासे आणि शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रविंद माळी, जिल्हा उपाध्यक्ष अल्केश महाजन, जिल्हा कार्याद्यक्ष महेंद्र माळी तसेच चोपडा शहर आणि तालुका पदाधिकारी समस्त युवक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content