माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मुखर्जी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

 

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर आर्मी रुग्णलयात उपचार सुरु आहेत. आजच त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आपली करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी स्वतःच ट्विट केले होते. त्यामुळे त्यांच्य्यावर करोनाचेही उपचार सुरुच होते. आता त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं आहे अशी माहिती मिळते आहे. माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गेल्या आठवड्याभरात ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या होत्या, त्या सर्वांना कोरोना चाचणी करुन आयसोलेट करण्याची विनंती करतो’ असं ट्वीट प्रणव मुखर्जी यांनी काल केले होते. दरम्यान, प्रणव मुखर्जी यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आपण एका दुसऱ्या कारणासाठी रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला करोनाची लागण झाली असल्याचे आढळले. गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कृपया स्वत:ला विलगीकरणात ठेवावं तसंच आपली कोविड चाचणी करावी अशी विनंती आहे.

Protected Content