विश्‍व हिंदू महासभेच्या नेत्याची हत्या

ranjit bacchan

गोरखपूर वृत्तसंस्था । विश्‍व हिंदू महासभेचे नेते रणजीत बच्चन यांची आज पहाटे गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

विश्‍व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची आज सकाळी गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेले असता अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. बच्चन हे आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. मॉर्निंग वॉक करीत असताना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञांत व्यक्तीने त्यांच्या डोक्यात गोळी घातली. त्यामुळे रणजीत बच्चन यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेवून तो शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. रणजीत बच्चन यांची हत्या कोणी केली. काय कारण असू शकते. याचा तपास पोलीस करीत आहेत.

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कायदा सुव्यवस्था सुरळीत असल्याचा केलेला दावा पुन्हा एकदा पोकळ ठरला आहे. दरम्यान, बच्चन यांच्या हत्येमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरल्याचे वृत्त आहे.

Protected Content