पिंपळगावला शिवरायांच्या पुतळा विटबंनेची अफवा; गावात तणावपूर्ण शांतता

वरणगाव प्रतिनिधी । येथुन जवळच असलेल्या बोदवड रोडवरील पिंपळगाव खुर्द येथे ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्यामुळे सर्वसामान साहित्य दुसरीकडे ठेवण्यात आले होते. सामाना सोबत ग्रामपंचायत कार्यालयातील एक ते दिड फुट शिवाजी महारांचा पुतळा देखील व्यवस्थीत कर्मचाऱ्यांकडून ठेवण्यात आला होता मात्र ठेवल्या जागी आढळून आला नाही म्हणुन कोणीतरी पुतळ्याची विटबंना झाली, अशी अफवा फसरवली होती. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वरणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक संदिपकुमार बोरसे अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीच्या शोधात असून पोलिसात कोणताही गुन्हा मात्र नोंद नाही.

पिंपळगांव खुर्द येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे नाविन बांधकाम करण्यात आले आहे या इमारत मधील सर्वसामान बांधकाम करण्यापुर्वी दुसरीकडे सुरक्षीत ठेवण्यात आले होते. इतर सामाना सोबत कार्यालयातील शिवाजी महाराजांचा एक ते दिड फुट असलेला पुतळा देखील होता मात्र सामानाच्या देखरेख अंती महाराजांचा पुतळा ठेवल्या ठिकाणी आढळून आला नसल्याने गावकऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य सरपंच व कर्मचाऱ्यांना विचारणा केली मात्र कोणाला काहीच माहिती नसल्याचे समजले असता गावकऱ्यांनी वरणगाव पोलिसांत पुतळा चोरीस गेला किंवा हरवल्याचा लेखी अर्ज दिला होता.पंरतू कोणीतरी अज्ञाताने शिवाजी महाराजांची पिंपळगाव खुर्द येथे पुतळ्याची विटंबना केली अशी अफवा फोनवरून गावोगावी केल्याने पिंपळगाव येथे विविध पक्षांचे पदाधीकारी व शेकडोच्या संख्येने शिवप्रेमी दाखल झाले असता त्या ठिकाणी तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते ऐन वेळी पोलिसांच्या लक्षात सदर विषय आल्याने सर्वांची समजूत काढून जमावाला शांत करून आपआपल्या गावी रवाना केले आणि घडल्या परीस्थीतीची चौकशी करीत असतांना सरपंच व ग्राम पंचायत सदस्यांनी पंचधातूचा महाराजांचा पुतळा आणला परंतु काही गावकऱ्यांनी विरोध केला होता पोलिसांनी सर्वत्र बाजू सांभाळत परीस्थीती आटोक्यात आणली असुन गावकरी, राजकिय पक्षांचे पदाधीकारी, पुढारी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच , ग्रामसेवक, यांचे लेखी जबाब घेतले असुन मात्र पोलिसांनी कोणा विरूध्द हि गुन्हा दाखल केलेला नाही परंतु अफवा पसरऊन फोन करून लोकाना जमा करणाऱ्या व्यवतीचा पोलिस शोध घेत आहे. यावेळी मुक्ताईनगरचे विभागीय पोलिस अधिकारी सुरेश जाधव, ए.पी.आय संदिपकुमार बोरसे, ए.पी.आय हरीष भोये पिंपळगांव बीट हवलदार संदिप बळगे घटना ठिकाणी होते

Protected Content