बी एच आर घोटाळ्याचा तपास राजकीय मुद्दा नाही — एकनाथराव खडसे

जळगाव : प्रतिनिधी । बी एच आर घोटाळ्याचा तपास राजकीय मुद्दा सपशेल नाही असे माजी मंत्री एकनाथराव  खडसे यांनी म्हटले आहे . 

आपला मुद्दा स्पष्ट करताना एकनाथराव खडसे पुढे  म्हणाले की , या पतसंस्थेत झालेल्या  घोटाळ्याचे स्वरूप आणि व्याप्ती मोठी आहे . नियमबाह्य वाटलेले कर्ज लोकांनी बुडवले . पात्रता नसताना किंवा काहीही तारण न घेता २/२ ,४/४, ५/५ कोटी रुपयांची कर्जे दिली गेली . याबद्दल २०१८ सालातच ऍड कीर्ती पाटील यांनी तक्रार केली होती त्या तक्रारीवरून त्यावेळीच केंद्रीय सहकारमंत्र्यांनी  आर्थिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते मध्यंतरी हा तपास रखडला त्याला काही कारणे असतील  आता त्या तपासाला वेग आला आहे शेकडो ठेवीदारांचे संसार या घोटाळ्यांमुळे उद्ध्वस्त झाले यांच्या पैशाच्या सुरक्षेचा आणि संरक्षणाचा हा मुद्दा आहे माझीही काहीही चूक नसताना एवढ्या चौकशा झाल्या एक चौकशी अजून सुरु आहे माझ्या चौकशा राजकीय नाहीं असेंहि म्हटले जाते . माझ्या चौकशा राजकीय नाहीत तर मग या पतसंस्थेचा  आणि घोटाळ्याचा तपास राजकीय कसा ? असा माझा प्रश्न आहे , असेही ते म्हणाले . 

मराठा आरक्षणाबद्दल एकनाथराव खडसे म्हणाले की , मराठा समाजातील गरीब आणि निमन मध्यमवर्गीय लोक आज हलाखीत जगात आहे हे वास्तव आहे त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार आरक्षण मिळाले पाहिजे हे ही खरे पण या आरक्षणाचा निर्णय १०२ व्या घटनादुरुस्तीमुळे आता राज्य सरकार घेऊ शकत नाही हा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा म्हणून केंद्रावर सगळ्यांनी मिळून दबाव आणावा लागणार आहे. 

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/520864119039473

 

Protected Content