श्रीराम माध्यमिक विद्यालयात पालक सभा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी|  श्रीराम माध्यमिक विद्यालयात पालक सभा घेण्यात आली.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी  हे होते कार्यक्रमास प्रमुख अतिथी विद्यालयाचे अध्यक्ष पन्नालाल वंजारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे महानगर अध्यक्ष , संस्थेचे सचिव अशोक लाडवंजारी विद्यालयाचे संचालक वासुदेव सानप, भगवान लाडवंजारी राहुल लष्करे, तसेच पालकांन मधून किरण कोचुरे, सौ आशाताई सैंदाणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते

 

 

कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून झाली इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी यांनी शैक्षणिक प्रगती विषयी अहवाल वाचन केले .पालकांनी  आपले मनोगत व्यक्त केले व आपल्या समस्या मांडल्या. या समस्यांची निराकरण शिक्षकांनी केले विद्यालयाचे अध्यक्ष पन्नालाल  वंजारी यांनी पालकांना मुलांच्या हिताविषयी काळजी घ्यावी व सर्व पालकांनी पालक सभेला उपस्थित राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महानगर अध्यक्ष व संस्थेचे सचिव  कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अशोक लाडवंजारी यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना  राबवले जातात व शैक्षणिक प्रगती साधली जाते याविषयी पालकांना मार्गदर्शन केले. व शालेय प्रगती विषयी समाधान व्यक्त केले पालकांमधून किरण कोचुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आशाताई सैंदाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच पालक सभेला मार्गदर्शन अमित तडवी  व सरस्वती पाटील मॅडम यांनी केले.

 

दिवाकर जोशी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी घरी अभ्यास करावा व पालकांनी अभ्यास बघावा अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन  दिनेश पाटील सरांनी केले तसेच कार्यक्रमाचे सहनियोजन व आभार संजय बडगुजर सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी साठी सर्व  कर्मचारी यांनी सहकार्य व परिश्रम केले

Protected Content