गवळीवाड्यातील वृध्दाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गवळी वाडा येथील ६० वर्षीय वृध्द व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील गवळी वाडा, तांबापूरा येथील रहिवाशी उत्तम तानकू हटकर (वय-६०) यांनी घरात कोणीही नसतांना दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आले. दरम्यान आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही.

सायंकाळी मुलगा घरी आल्यावर जिभाऊ उत्तम हटकर यांच्यालक्षात आला. त्यांनी तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. विसपुते यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात वैद्यकिय अधिकारी डॉ. विसपूते यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content