ईकरा थिम महाविद्यालयाला दोन सुवर्ण पदक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या सभागृहात आज ३० वा दीक्षांत समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. शहरातील ईकरा थिम महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींनी सुवर्णपदक प्राप्त केले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भूषवत दूरदृष्य प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यापीठाचे कुलगुरू व्हि.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

शहरातील ईकरा थिम महाविद्यालयाच्या खान हमेरा अय्युब खान या विद्यार्थीनीने ‘बॉटनी’ या विषयात तर कौसर बी नियाज-उद्दीन शेख या विद्यार्थिनीने बी.ए. ‘उर्दू’ मध्ये सुवर्णपदक पटकावले. या सोबतच प्रा,कहकशां खान यांना ‘उर्दु’ विषयात पी.एच.डी. प़दान करण्यात आली.

या यशाबद्दल इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम, डॉ.इकबाल शाह, प्राचार्य इब्राहिम पिंजारी, डॉ.राजेश भामरे, डॉ.चांद खान, डॉ.अमिनोद्दीन काझी, डॉ.फिरदौस शेख यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Protected Content