पहूर येथे मंदीर प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्ती सोहळा निमित्त कार्यक्रम

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर येथील प्राचीन व जागृत देवस्थान असलेल्या श्रीक्षेत्र केवडेश्वर महादेव मंदिर व खंडेराव महाराज मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्ती सोहळा निमित्त उद्यापासून किर्तन व रात्री खंडेराव महाराज जागरण गोंधळ व महाअभिषेक व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पहूर येथील श्री क्षेत्र केवळेश्वर महादेव मंदिर व खंडेराव महाराज मंदिर प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्ती सोहळा निमित्त 13 जुलै गुरुवार रोजी रात्री साडेआठ वाजता हभप महादेव महाराज निपाणेकर ( भागवताचार्य ) यांचे कीर्तन होणार असून खंडेराव महाराज मंदिर येथे जागरण व गोंधळ रात्री साडेदहा वाजता होणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक 14 जुलै रोजी केवडेश्वर महादेव मंदिर पिंडीचा महा अभिषेक श्री मुकुंद पंढरीनाथ जोशी यांच्या वाणीतून होणार आहे. तर खंडेराव महाराज पिंडीचा महा अभिषेक खंडेराव मंदिर पहूर येथे श्री नंदू प्रभाकर जोशी यांच्या वाणीतून होणार आहे. महा अभिषेकानंतर सकाळी 11:30 महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व पंचक्रोशीतील भावी भक्तांनी सदर कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक श्री क्षेत्र केवळेश्वर महादेव मंदिर विश्वस्त मंडळ व खंडेराव महाराज वाघे( भक्त ) मंडळ व समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.

Protected Content