सहाय्यक मोटार वाहन निरिक्षकाला दोघांकडून शिवीगाळ; गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काव्यरत्नावली चौकातील आरटीओ कार्यालयात २ जणांनी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकाला काही कारण नसताना दोन जणांनी अश्लिल शिवीगाळ करत दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवार १२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील काव्यरत्नाली चौकात जवळ आरटीओ विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयात विशाल भगवान बटुळे (वय-३१) रा. आदर्श नगर, जळगाव हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून नोकरीला आहे. सध्या ते कार्यालयीन अधीक्षकपदाचा देखील कार्यभार सांभाळत आहे. ७ जुलै रोजी ते दैनंदिन काम करत असताना दुपारी ४ वाजेच्या सुमारास आरटीओचे खाजगी स्वरूपात काम करणारे एजंट गणेश ढेंगे व सुलतान मिर्झा हे दोन जण आले. या दोघांनी विशाल बटुळे यांच्यावर मोठमोठ्याने ओरडू लागले. त्यानंतर शिवीगाळ करत दमदाटी केली. यावेळी कार्यालयातील हजर असलेले कर्मचारी राजीव ठोके, सुनीता मराठे, संतोष मानकर, स्वप्निल वाघ, निलेश परदेशी, योगिता देहडे, विशाखा नाईक, विशाल पाटील, विशंभर गोमटे असे कर्मचाऱ्यांनी दोघांना आवरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही नागरिकांनी आवराआवर केल्यानंतर दोघं कार्यालयातून निघून गेले. यासंदर्भात सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक विशाल बटुळे यांनी बुधवारी १२ जुलै रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी गणेश ढेंगे व सुलतान मिर्झा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content