जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते वृक्षारोपण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील न्युक्लिअस हॉस्पिटल जवळील महामार्गावर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते सोमवारी ५ जून रोजी सकाळी वृक्षारोपण करण्यात आले.

 

राज्यात जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील न्यूक्लिअस हॉस्पिटल परिसरात शहरातील नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सोमवारी ५ जून रोजी सकाळी ११ वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, वृक्षारोपण करणे ही आजच्या काळाची गरज आहे. जळगाव शहरातील तापमान हे राज्यातील दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे पुर्णपणे संवर्धन करणे गरजेचे आहे. असे देखील त्यांनी सांगितले.

 

याप्रसंगी गटनेते अनंत उर्फ बंटी जोशी, जनमत प्रतिष्ठानचे पंकज नाले, निषा पाटील, नेहा जगताप, किमया पाटील, कीर्तनकार माईसाहेब, राधिका पाटील, शरयू महाजन, माधुरी शिंपी, नीता वानखेडकर, वंदना मंडावरे, मीनाक्षी शेजवळ, भाग्यश्री महाजन, हर्षाली तिवारी उपस्थित होते.

Protected Content