जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे व कुलसचिव डॉ. विनोद पाटील यावेळी उपस्थित होते. संचालक प्रा.ए.एम. महाजन अध्यक्षस्थानी होते. प्रा.डोंगरे यांनी नव्या धोरणात विद्याशाखांच्या सीमा आता राहिलेल्या नाहीत असे सांगितले. यावेळी घेण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धेचे उद्घाटन कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी केले. यामध्ये लेखमाला इंगळे हिने प्रथम, अनिरूध्द मांडेकर याने द्वितीय तर राहिणी नुक्ते हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
प्रा.एस.टी. बेंद्रे यांनी पोस्टर स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एस.एस. घोष यांनी केले. डॉ.डी.जे. शिराळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. पी.जी. चव्हाण, डॉ. जसपाल बंगे आणि डॉ. वंदना शिंदे यांनी केले.