एरंडोल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल येथील पोलिस ग्राउंडवर होमर्गाड स्थापना दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांच्या आदेशानुसार पथकातील तालुका समादेशक अधिकारी प्रवीण ढाकणे यांच्या मार्गदर्शना खाली हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमासाठी वरिष्ठ पलटण नायक दिनेश पाटील, पलटण नायक, रमजान दैवते, गुलाब चौधरी, अ. लिपीक गोविंद साळी व सर्व पुरुष व महिला होमगार्ड यांनी परिश्रम घेतले. यासाठी पोलिस निरीक्षक गोराडे, सहायक पोलिस निरीक्षक पवार यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी पोलिस ग्राउंड येथे स्वच्छ्ता मोहीम राबविण्यात आली, तसेच एरंडोल शहरात तहसील कार्यालय, बुधवार दरवाजा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भगवा चौक, अमळनेर दरवाजा, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबाफुले, घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर या मार्गे मोटर सायकल रॅली काढण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबाफुले, घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले. होमगार्ड जवानांना त्यांचे कर्तव्य व उद्देश विमोचन, अग्निशमन, बचावकार्य, आणि संघटने बाबत माहिती देण्यात आली. शहरातील नागरीकान कडून या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले.