यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रा. मुकेश पोपटराव येवले यांची कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथील कॉलेज कमिटीच्या चेअरमनपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती १ जुलै पासून लागू होणार असल्याचे पत्र जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे मानद सचिव निलेश भोईटे यांनी दिले आहे.
विशेष म्हणजे, प्रा. मुकेश येवले हे याच महाविद्यालयात ३२ वर्षांहून अधिक काळ सेवा देऊन ३० जून २०२५ रोजी सेवानिवृत्त होत असतानाच, त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यातच त्यांना या नव्या जबाबदारीचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे व्हाईस चेअरमन विरेंद्र भोईटे, महाविद्यालयाचे माजी चेअरमन तथा माजी आमदार रमेश चौधरी, संस्थेचे अध्यक्ष गोकुळ पाटील, ज्येष्ठ संचालक जयवंतराव येवले, संचालक परमानंद साठे, तज्ज्ञ संचालक महेंद्र भोईटे, उमाकांत पाटील, सुनील भोईटे यांच्या हस्ते प्रा. मुकेश येवले यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार रमेश चौधरी, प्रभाकर सोनवणे, भगतसिंग पाटील, डॉ. कुंदन फेगडे, प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे, नूतन मराठा महाविद्यालय जळगावचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, वरणगाव येथील प्राचार्य विजय पवार, डी. पी. साळुंके, अनिल साठे, ग.स. सोसायटी संचालक राम पवार व मंगेश भोईटे, माजी प्राचार्य एफ. एन. महाजन, फैजपूरचे माजी प्राचार्य डॉ. जी. पी. पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष शेखर पाटील, माजी नगराध्यक्ष दीपक बेहडे, पिंटू राणे, राकेश कोलते, माजी उपप्राचार्य सुरेश कदम, प्रा. डॉ. एम. डी. खैरणार, उपप्राचार्य प्रा. अशोक काटकर, माजी उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील, विजय पाटील, मुख्याध्यापक एम. के. पाटील, माजी मुख्याध्यापक प्रा. किरण दुसाने, प्रा. बिरपणकर, इंदिरा गांधी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अयुब खान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याला जळगाव, वरणगाव आणि यावल महाविद्यालयांचे प्राध्यापक, कर्मचारी, तसेच यावल तालुक्यातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शैक्षणिक संस्थांचे संचालक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी प्रा. मुकेश येवले यांना त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.