Home Cities अमळनेर प्रा. डॉ. विजय गाढे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी...

प्रा. डॉ. विजय गाढे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड 

0
7


अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. विजय शालिग्राम गाढे यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. खान्देश विभागातील पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि संघटनात्मक कौशल्याची दखल घेऊन त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडीमुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील पत्रकार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मान्यतेने राज्य संघटक किशोर रायसाकडा आणि उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश विसपुते यांनी अधिकृत नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली. या नव्या जबाबदारीनुसार प्रा. डॉ. गाढे यांच्यावर जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर या पाच महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये संघटनेचा विस्तार करण्याची प्रमुख जबाबदारी असणार आहे. संघटनेची ध्येयधोरणे आणि नियमावलीचे तंतोतंत पालन करून पत्रकार बांधवांच्या अडीअडचणी सोडवणे तसेच उत्तर महाराष्ट्रात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सक्रिय कार्य करण्याचे आवाहन नियुक्तीपत्राद्वारे करण्यात आले आहे.

ही नियुक्ती राज्य समन्वयक संजय जी. भोकर, राज्य अध्यक्ष नितेश सोमाणी, राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोठे आणि राज्य संघटक किशोर रायसाकडा यांच्या विशेष मान्यतेने करण्यात आली आहे. प्रा. डॉ. विजय गाढे यांच्या दीर्घ अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा फायदा संघटनेच्या भावी वाटचालीस निश्चितच होईल, असा ठाम विश्वास राज्य संघटक किशोर रायसाकडा यांनी व्यक्त केला. या नियुक्तीबद्दल पत्रकारिता, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातून प्रा. डॉ. गाढे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Protected Content

Play sound