जळगाव प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळने दहावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवले आहेत आणि प्रियांशी महाजनने ९८.४० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला आहे.
डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, भुसावळने यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून १५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांवर गुण संपादन केले आहे. यात दुसर्या क्रमांकावर क्रिष्णा अग्रवाल ९६.६० टक्के, तृतीय अक्षजा पाटील ९६.४०टक्के, चर्तुथ अमेय पाटील ९८.४० टक्के, पाचवा अंकुर निगम ९४.४० टक्के, सहावा क्रमांक हितल पाटील ९४.२० टक्के, सातव्या स्थानी ईश्वरी पाटील ९४ टक्के, आठवा क्रमांक जयंती बारापात्रे ९३.८० टक्के, नववा क्रमांक आर्या कुलकर्णी ९३.४ टक्के, दहाव्यास्थानी प्रेमकुमार पाटील ९२.६०, देवेश पाल ९२.४ टक्के, मेघना राज ९०.८० टक्के, प्रज्ञा तायडे हिने ९०.२० टक्के गुण प्राप्त केले आहे. प्रियांशी महाजन हिने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून आहे. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील, सचिव वर्षा पाटील, सदस्य डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, मुख्याध्यापिका अनघा पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांसह मनोगत व्यक्त केले आहे.