भादली शिवारातून वाघूर प्रकल्पाच्या पाईप व्हॉल्व्हची चोरी

नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भादली शिवारात वाघुर कालवा उपसा सिंचन योजनेअंतर्गत लागणारे पाईपाचे व्हॉल्व अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नशिराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या कानासवाडा, शेळगाव, कडगाव व इतर शिवारात राबविण्यात आलेल्या वाघूर कालवा उपसा सिंचन योजनेअंतर्गत भादली शिवारात येथे काही पाईपाचे व्हॉल्व्ह ठेवण्यात आले होते. दरम्यान १ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचे ७५ व्हॉल्व्ह अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार बुधवार २७ जुलै रोजी सकाळी उघडकीला आले. या संदर्भात या प्रकल्पाचे व्यवस्थापक खुशाल डोंगरमल देसर्डा (वय-३२, रा. भिकमचंद जैन नगर, यश लॉन जळगाव) यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून बुधवारी २७ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.