Home Cities जळगाव महर्षी व्यास युवाशक्ती बहुद्देशीय संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम(व्हिडिओ)

महर्षी व्यास युवाशक्ती बहुद्देशीय संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम(व्हिडिओ)

0
104


जळगाव प्रतिनिधी । महर्षी व्यास युवाशक्ती बहुद्देशीय संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील वाल्मिक नगर परिसरातील उद्यानात या संस्थेचा  ६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

महर्षी व्यास  बहुद्देशीय संस्थेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण तसेच कबड्डीच्या खेळाडूंना किट शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.  कोरोनाच्या कठीण काळामध्ये गरजूंना फूड पॅकेटच वाटप या संस्थेच्या वतीने करण्यात आले. दररोज शंभर गरजूंची भूक या संस्थेच्या माध्यमातून भाग विण्यात येत असते. आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी वर्गाचे क्लासेस मोफत या संस्थेच्या वतीने घेण्यात येत असतात. आज या संस्थेला सहा वर्षे पूर्ण झाली असून छोट्याच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र सोनवणे, कार्याध्यक्ष अश्विन शंकपाळ यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला मनोज सोनवणे, बाळू रणसिंगे, विनोद सोनवणे, राहुल  सपकाळे, मुन्ना सोनवणे,  दुर्गेश साळुंखे, गणेश कोळी, राहुल सौंदाणे, वरूण बाविस्कर, गोकुळ कोळी, पवन ठाकरे, सागर सपकाळे आदीची यावेळी उपस्थिती होती.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/498690954728003

 


Protected Content

Play sound