एरंडोल तालुक्यात अवैध वृक्षतोड

एरंडोल प्रतिनिधी । शासन करोडो रुपये खर्च करून पर्यावरण समतोल राखण्यासाठी दरवर्षी वृक्षारोपण करत असते. मात्र एरंडोल तालुक्यात स्वार्थासाठी छुप्या पद्धतीने वृक्षतोड करण्यात येते असून याकडे वनविभागातील अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. 

शासन करोडो रुपये खर्च करून पर्यावरण समतोल राखण्यासाठी दरवर्षी वृक्षारोपण करत असते. मात्र काही अधिकारी व कर्मचारी हे आपल्या फायद्यासाठी जाणून बुजुन दुर्लक्ष करतात. एरंडोल तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांच्या आशीर्वादने बिनधास्तपने अवैध वृक्ष करतात.तालुक्यातील कंपनी व्यवसाईक,वीट भट्टीवाले त्या वृक्षतोडीचा राजरोसपणे वापर करतात.

या सर्व प्रकाराबद्दल अधिकाऱ्यांना विचापुस केल्यास ते उडवा उडवीचे उतरे देतात. असाच एक प्रकार पद्मालय रस्त्यावरील शेतकरी महेंद्र पाटील यांच्या शेतातील गट नं.३९९/१ व २ मधील शेताच्या बांधावरील तीन कातसांबर जातीचे जवळपास ५० ते ६० फुटाचे तीन डेरेदार वृक्ष दिवसाढवळ्या तोडण्यात आले.महेंद्र पाटील यांनी वनविभागाकडे तोंडी तक्रार केली असता तोडत असतांनाच आम्ही कारवाई करू शकतो अन्यथा नाही अशी उतारे संबंधित अधिकाऱ्याने उत्तरे दिली.

महेंद्र पाटील यांनी वनविभागाला दि.२ फेब्रुवारी २०२१ रोजी लेखी तक्रार केली.तरी देखील तब्बल चार महिने उलटून देखील आजही अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता उडवा उडवीचे उत्तरे मिळत आहेत.यावरून असे दिसते की तालुक्यात होणारे अवैध वृक्षतोड एरंडोल वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या आशीर्वादानेच होत असल्याचे बोलले जात आहे.

तरी या सर्व प्रकाराकडे वरीष्ठांकडून त्वरित दखल घेऊन चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पर्यावरणाची झीज व शासनाचा पैसा वाचवावा अशी मागणी होत आहे.

 

Protected Content