गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात २ हजार ३४६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होत असून हा उत्सव निर्विघ्न व शांततेत पार पडावा यासाठी पोलिस दलाने रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच उपद्रवींची यादी तयार करीत जिल्ह्यात दोन हजार ३४६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात दोन हजार ७८१ मंडळातर्फे यंदा गणेशोत्सव साजरा होणार आहे.

 

गणेशोत्सव निर्विघ्न व शांततेत पार पडावा यासाठी पोलिस दलाने दोन महिने अगोदरच तयारी केली. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी उपविभागीय व प्रभारी अधिकाऱ्यांकडून त्यांच्या हद्दीतील गणेश मंडळे तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा प्रस्ताव मागविला. गेल्या काही दिवसांवर उपद्रवींवर कारवाई केली जात असून आता गणेशोत्सवात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या जिल्ह्यातील काही जणांवर एमपीडीएचीदेखील कारवाई केली जाणार आहे.

 

यंदा जिल्ह्यात दोन हजार ७८१ मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा होणार आहे. यात  एक हजार ९३५ सार्वजनिक गणेश मंडळ असून ६९१ खासगी मंडळ आहेत. जळगाव शहरात ३७१ गणेश मंडळं आहेत.  या उत्सवासाठी एसआरपी, सीआयएसएफ, होमगार्ड यांचा अतिरिक्त बंदोबस्त मागविला आहे.

 

असे गणेश मंडळ

सार्वजनिक : १९३५

खासगी : ६९१

एक गाव एक गणपती : १५५

 

अशा आहेत प्रतिबंधात्मक कारवाया

प्रकार    कारवाईची संख्या

१०७ : ७०६

११० : २७३

१४४ (२) : ४०६

१४९ : ७३०

मुंबई पोलीस ९३ : १५४

५५ : ३५

५६ : १८

५७ : १२

एमपीडीए – १२

 

बाहेरुन दाखल झालेला बंदोबस्त

एसआरपी – १ कंपनी

सीआयएसएफ – १

नवप्रविष्ट कॅडेट – ८

नवप्रविष्ट कर्मचारी : २००

नवप्रविष्ट महिला : १००

पुरुष होमगार्ड : १५००

महिला होमगार्ड : २००

 

स्थानिक बंदोबस्त

पोलिस अधीक्षक : ०१

अपर पोलिस अधीक्षक : ०२

पोलिस उपअधीक्षक : ०८

यासह पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, अमलदार (पुरुष), अमलदार (महिला), आरसीपी प्लाटून, स्ट्रायकींग फोर्स, क्युआरटी पथक राहणार आहे.

 

दिवसनिहाय विसर्जन

दिवस- मंडळ संख्या

तिसरा दिवस – ४

पाचवा दिवस – १८१

सहावा दिवस – ३

सातवा दिवस – ४१६

आठवा दिवस – ३१

नववा दिवस – १५५

दहावा दिवस -१९६५

अकरावा दिवस – २६

Protected Content