तीन नव्या फौजदारी कायद्यांवर राष्ट्रपतीचीं स्वाक्षरी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | फौजदारी कायद्यांशी संबंधित तीन विधेयकांचं आता कायद्यात रुपांतर झालं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही विधेयकांवर स्वाक्षरी केले असल्याने त्यांचे कायद्यात रुपांतर झाले आहे. भारतीय न्याय (द्वितीय) संहिता २०२३, नागरिक सुरक्षा (द्वितीय) संहिता २०२३, भारतीय साक्ष (द्वितीय) हे तीन कायदे अस्तित्वात आले आहेत.

फौजदारी प्रक्रियेशी संबंधित तिन्ही विधेयक राज्यसभा आणि लोकसभेमध्ये मंजूर झाली होती. त्यानंतर ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर करण्यात आली. राष्ट्रपतींनी तिन्ही विधेयकांवर स्वाक्षरी केली असल्याने त्यांचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. ब्रिटिश काळांपासून लागू असलेल्या जुन्या फौजगारी कायद्यांना हटवून त्यांचे भारतीयकरण या कायद्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान बोलावण्यात आले होते. तिन्ही कायदे लोकसभेत मंजूर झाल्यानंतर ते राज्यसभेत मांडण्यात आले होते. अनेक विरोधकांचे निलंबन झाले असल्याने फारशा चर्चेविना विधेयकं मंजूर करण्यात आले. यावेळी दूरसंचार नियमनासंबंधी आणि निवडणूक आयुक्तांच्या निवडीसंबंधी विधेयक देखील मंजूर करुन घेण्यात आले.

भारतीय न्याय (द्वितीय) संहिता २०२३, नागरिक सुरक्षा (द्वितीय) संहिता २०२३, भारतीय साक्ष (द्वितीय) विधेयकांच्या मंजुरीवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यसभेत बोलताना म्हणाले की, तीन नव्या विधेयकांचा हेतू शिक्षा देण नसून न्याय देणे हा आहे. या नव्या कायद्यांमुळे तारीख पे तारीख युगाचा अंत होईल आणि लोकांना न्याय मिळेल.

Protected Content