पत्रकार वारिसेंच्या हत्येमागील सूत्रधार शोधा : राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पत्रकार वारिसे यांच्या हत्येमागील सूत्रधार शोधा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यांनी या प्रकरणातील आरोपीचे भाजप नेत्यांसह शिंंदे गटाशी संबंध असल्याचाही गंभीर आरोप केला आहे.

आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार अविनाश वारिसे यांच्या हत्येबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, पंधरा दिवसांपूर्वी त्याठिकाणी अंगणेवाडी इथं एक देवीची यात्रा पार पडली. मुंबईहून हजारो लोक या यात्रेला जातात. या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत विधान केलं की, रिफायनरी आम्ही घेऊन येऊ कोण रोखतंय ते पाहू. त्यांच्या या विधानानंतर २४ दिवसांनी रिफायनरीला विरोध करणारे पत्रकार शशीकांत वारीसे यांची निर्घृण हत्या झाली. या अर्थ काय आहे? हा केवळ एक योगायोग नाहीए. या हस्तेमागं मोठा कट आहे, मी काय बोलतोय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलच माहिती आहे. आजवर कोकणात २५ वर्षात जेवढ्या राजकीय हत्या झाल्या आहेत त्यात या घटनेचाही समावेश आहे, असा आरोपही यावेळी राऊत यांनी केला आहे.

खासदार राऊत पुढे म्हणाले की, शिवसेना या पत्रकाराचं बलिदान व्यर्थ जाऊन देणार नाही. कोकणाच्या भूमीत लोकमान्य टिळकांसारख्या पत्रकारांची मोठी परंपरा आहे, तिथं ही घटना घडते हे निषेधार्ह आहे. यामध्ये श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, रमेश गोवेकर या यादीत आता शशीकांत वारीसे यांचं नाव समाविष्ट झालं आहे. वारीसे प्रकरणाची देशभरात चर्चा आहे, त्यामुळं केंद्र सरकारनं याची दखल घ्यावी. आपण याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, यानंतर संजय राऊत यांनी वारिसे यांच्या हत्येतील आरोपीचा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सोबतचा फोटो ट्विट करून या प्रकरणातील सत्य शोधण्याची मागणी केली आहे.

Protected Content