चोपड्यात भीषण आग : तरूणाचा होरपळून मृत्यू

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरात काल मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत एका तरूणाचा मृत्यू झाला आहे.

चोपडा शहरात काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास राहूल एंपोरियम या दुकानाला आग लागली. या आगीचे लोळ याच इमारतीत राहणार्‍या राखेच्या कुटुंबाच्या घरापर्यंत पोहचले. या अग्नीतांडवात गौरव सुरेश राखेच्या या ३० वर्षे तरूणाचा होरपळून मृत्यू झाला तर संकेत राखेचा हे जखमी झाले आहेत. दरम्यान, या कुटुंबातील सुरेश राखेचा आणि कविता राखेचा यांना घरातून सुरक्षितपणे काढण्यात आले आहे.

आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. नगरपालिकेच्या अग्नीशामक दलाने धाव घेतल्याने बर्‍याच वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यात मोठ्या प्रमाणात वित्त हानी देखील झाली आहे. तर गौरव राखेच्या यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर वज्राघात झाला आहे. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते.

Protected Content