यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अनुसुचित जमाती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य हे जनसंवाद दौऱ्यात दोन दिवसीय जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता राज्यातील आदिवासी समाज बांधवांचा विविध समस्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या अनुसुचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मिना राजु तडवी यांनी आयोगाचे राष्ट्रीय प्रमुख अंतरसिंह आर्य यांना निवेदन सादर केले. अनुसुचित जमातीच्या आयोगाचे राष्ट्रीय प्रमुख हे आपल्या दोन दिवसीय आदिवासी बांधवांच्या समस्या व मागण्यांच्या विषयाला जाणून घेण्यासाठी जनसंवाद दौऱ्यावर आले होते.
यावेळी भारतीय जनता पक्षाच्या अनुसुचित मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मिना राजु तडवी यांनी आयोगाचे सिंह यांची जळगाव येथील अंजिठा विश्रामगृह येथे भेट घेऊन जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या विविध अडचणी व समस्यांबाबत आयोगाचे अध्यक्ष यांच्याशी सविस्तर चर्चा करीत त्यांना निवेदन देवुन सादर करून माहिती दिली. याप्रसंगी मिना तडवी यांच्या सोबत हिंगोणा सरपंच रहीसा तडवी, परसाडे ग्रामपंचायत सदस्य मदीना तडवी, रोशन तडवी ,अखिल भारतीय विकास परिषदचे जिल्हा सरचिटणीस अनिस तडवी यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील आदिवासी तडवी भिल्ल महिला मंडळाचे पदधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. दरम्यान आदिवासी समस्याबाबत राष्ट्रीय आयोगचे अंतरसिंह आर्य यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्या वृत्त आहे .