नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विश्वशांतीसाठी प्रार्थना व महापूजा

जळगाव, प्रतिनिधी । येथील जळगावचा राजा नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विश्वशांतीसाठी प्रार्थना व महापूजा करण्यात आली. यावेळी करोनाचे संकट दूर होऊ दे, सर्व नागरिकांना सुख, शांती समृद्धी मिळू दे असे साकडे श्री गणरायाला घालण्यात आले.

गेल्या ३४ वर्षापासून नेहरू चौक मित्र मंडळ वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहे. यंदा देखील करोना संक्रमणाच्या काळात शासकीय नियम पाळून श्री गणेशाची स्थापना मंडळाने केली आहे. सर्वप्रथम गरजू मुलांना वह्या वाटप करण्यात आल्या. त्याचा २० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. त्यानंतर येणाऱ्या भाविकांना आणि परिसरातील नागरिकांना करोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक आयुष काढा वाटप करण्यात आला.

सर्वप्रथम पुरोहितांनी पौरोहित्य करीत अथर्वशीर्ष व मंत्र म्हटले. त्यावेळी तीन जोडप्यांच्या हातून सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. यात अश्विनी दीपक पाटील, काजल आयुष गांधी, तृप्ती स्वप्नील भावसार यांचा समावेश होता. प्रसंगी श्री गणेशाला मंडळातर्फे साकडे घालण्यात आले. विश्वशांती रहावी म्हणून प्रार्थना करण्यात आली.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाविकांनी दर्शन घेऊन श्री गणेशाची आराधना केली.

Protected Content