फैजपूर येथे भाजपा वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  फैजपूर येथील भाजपाच्या विद्यमाने येथील श्री राम मंदिर सभागृहात कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या भरगच्च उपस्थितीमध्ये भाजपाचा ४३ वा वर्धापन दिन मोठ्या जललोषात साजरा करण्यात आला.

 

याप्रसंगी भारत माता व भाजपाच्या ध्वजाचे विधिवत पूजन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचा विजय असो, वंदे मातरम्, भारत माता की जयच्या घोषणा निनादाणे  परिसर गुमगुमला. याप्रसंगी ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव भारत महाजन, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नितीन राणे, माजी नगराध्यक्ष बी.के. काका चौधरी, मिलिंद वाघुळदे, निलेश राणे, शहराध्यक्ष अनंता नेहेते, सरचिटणीस संजय सराफ, तालुकाध्यक्ष नितीन नेमाडे, महिला मोर्चा जयश्री चौधरी, शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष सिध्देश्वर वाघुळदे, युवा मोर्चा ता.उपाध्यक्ष हरीश होले, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्याम भंगाळे, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष अनुराधा परदेशी, विकास सोसा. संचालक नरेंद्र चौधरी, कामगार नेते किरण चौधरी, रविंद्र होले, वसंत परदेशी, डॉ उमेश चौधरी, अनिरुद्ध सरोदे, पप्पू चौधरी, दिपाली झोपे, विनोद बोरोले, संदीप भारंबे, अक्षयसिंह परदेशी, जितेंद्र भावसार, दिलीप भंगाळे यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content