फैजपुरात विविध ठिकाणी हनुमान जन्मोत्सव साजरा

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरांमध्ये विविध भागातील हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. हनुमान जन्मोत्सव समितीतर्फे बुधवार ५ एप्रिल रोजी सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच हनुमान जन्मोत्सव समितीतर्फे सायंकाळी ४ वाजता भव्य दिव्य हनुमान जन्मोत्सवानिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

आज सकाळी पहाटे 6 वाजता हनुमान जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष वैभव वकारे यांच्या हस्ते त्रिवेणी वाडा येथील हनुमान मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. तसेच गावातील मोठे मारुती मंदिरात  कल्पेश खत्री यांच्याहस्ते हनुमानाची विधिवत पूजा करण्यात झाली. तसेच शहरातील विविध मंदिरांमध्ये आज सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली आज सायंकाळी 4  निघणाऱ्या हनुमान जन्मोउत्सव  मिरवणुकीला सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन हनुमान जन्मोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content