प्रताप सरनाईक यांची मालमत्ता ईडीच्या रडारवर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आमदार प्रताप सरनाईक यांची मालमत्ता ईडीच्या रडारवर असल्याची माहिती आज समोर आली आहे.

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांची सुमारे ११ कोटींची मालमत्ता ईडीच्या रडारवर असल्याचे दिसून आले आहे. ईडीने जप्त केलेली ११. ४ कोटींची संपत्ती योग्य असलाचा निर्णय क्वाशी ज्युरीशरी बॉडीने दिला आहे. प्रताप सरनाईक यांची एनएसईएल घोटाळा प्रकरणात ११.४ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. मार्चमध्ये ईडीने त्यांचे ठाण्यातील दोन फ्लॅट आणि मीरा रोडमधील जमिनीचे प्लॉट जप्त केले होते. या कारवाईविरोधात सरनाईक यांनी क्वाशी ज्युरीशरी बॅाडीकडे आव्हान दिले होते. मात्र, ईडीची जप्तीची कारवाई योग्य असल्याचा निर्णय देण्यात आला आहे. त्यानंतर आता जप्त केलेली संपत्ती ईडी ताब्यात घेणार असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, शिंदे गटात दाखल झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई थंड बस्त्यात जाणार असल्याचे मानले जात होते. तथापि, त्यांच्यावर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.

 

Protected Content