चोरीच्या गुन्ह्यातील फरार असलेला सराईत चोरटा एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये अनेक दिवसांपासून फरार असलेल्या सराईत मोबाईल चोरटा संदीप केशव गोपाळ (वय २१, रा. आयटीआय कॉलनी, जामनेर) याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी ५ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास राहत्या घरातून मुसक्या आवळल्या. त्याचकडून चोरीतील ९ हजार ४०० रुपयांची रोकड व मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

जामनेर येथे मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने या घटना उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोउनि गणेश वाघमारे, पोहेकॉ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, पोना विजय पाटील, रणजीत जाधव, सचिन महाजन, प्र्रितम पाटील, संदीप सावळे, किरण चौधरी ईश्र्वर पाटील, लोकेश माळी यांचे पथक तयार करुन बुधवारी ५ जुलै रोजी रवाना केले. या पथकाने चोरीच्या गुन्ह्यातील संशयित संदीप केशव गोपाळ याला दुपारी २ वाजेच्या सुमारास त्याच्या घराच्या परिसरातून अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या गुन्हयातील रोकड व मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी त्याला जामनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे.

Protected Content