कोरोना : जळगाव जिल्हा रूग्णालयात चार संशयित रूग्ण दाखल

जळगाव प्रतिनिधी । देशात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जिल्ह्यात देखील कोरोनाचे ४ संशयीत रुग्ण दाखल होत आहे. आज जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात सोळा महिन्याच्या बाळासह एकाच कुटूंबातील तीन असे चार संशयीत दाखल झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील संशयीतांचा आकडा आता ३९ वर गेला आहे.

संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजविला असून दररोज कोरोनाचे संशयीत रुग्ण वाढत आहे. जिल्ह्यात देखील कोरोनाचे संशयीत रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून एरंडोल तालुक्‍यातील खडका येथील सोळा महिन्यांच्या बाळावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. आज या बाळाला ताप, सर्दी, खोकला व श्‍वास घेण्यास त्रास जाणवत असल्याने या बाळाला कोरोना कक्षात दाखल करुन त्याच्यावर उपचार सुरु आहे. तसेच जळगावातील एकाच कुटूंबातील तीन जणांना सर्दी, खोकला, तापासह घशात त्रास होत असल्याने ते देखील कोरोना कक्षात दाखल झाले आहे. यामध्ये 72 वर्षीय वृद्ध महिला, 45 वर्षीय वयस्कर गृहस्थ व 24 वर्षाचा युवकाचा समावेश आहे. या चौघ संशयीतांच्या थुंकींचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे.

Protected Content