भुसावळात गावठी कट्ट्यासह एकास अटक

bhusawal crime news

भुसावळ प्रतिनिधी । शहरात अवैधरित्या गावठी कट्टा व जिवंत काडतुसे घेवून फिरणाऱ्या भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी संशयितास ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातील कट्टा व जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमेश कडू बाणाईत (24, रा.गणेशपुरी, केळकर हॉस्पिटल जवळ, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून 5 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल तसेच 1 हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस बाजारपेठ पोलिसांनी 4 रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास टी.व्ही. टॉवरसमोरून जप्त करण्यात आले.

भुसावळचे उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे उपनिरीक्षक सारीका कोळपकर, हवालदार शंकर पाटील, दीपक जाधव, यासीन पिंजारी, कृष्णा देशमुख, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी आदींनी ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार शंकर पाटील करीत आहेत.

Protected Content