धक्कादायक : आश्रमशाळेतील परिसरात तरूणाने घेतला टोकाचा निर्णय !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दहिवद आश्रम येथील ३१ वर्षीय तरूणाने शाळेतील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवार १६ मार्च रोजी दुपारी २ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भैय्यासाहेब यशवंत कोळी वय ३१ रा. बोरअजंटी ता.चोपडा. ह.मु. आश्रम शाळा दहिवद ता. अमळनेर असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील बोरअजंटी येथील रहिवाशी असलेला भैय्यासाहेब यशवंत कोळी हा तरूण अमळनेर तालुक्यातील दहीवद येथील आश्रम शाळेत वासतव्याला होता. शनिवार १६ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास भैय्यासाहेब कोळी याने आश्रम शाळेतील निंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. हा प्रकार येथील काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने खळबळ उडाली आहे. त्याला खाली उतरवून अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. या घटनेबाबत सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ सुनिल जाधव हे करीत आहे.

Protected Content