प्रशांत किशोर वाचवणार ममता दिदींचा गड ?

Mamata To Employ Strategist Prashant Kishore india Politics DKODING

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालमध्ये २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत बंगालचा गड भाजपपासून सुरक्षीत ठेवण्यासाठी तृणमूल काँग्रेसने राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी हातमिळवणी केली आहे. मात्र, प्रशांत किशोर हे भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यापेक्षा मोठे राजकीय रणनितीकार असूच शकत नाही, असा दावा भाजपने केला आहे.

 

भाजप महासचिव विजयवर्गीय म्हणाले की, प्रशांत किशोर यांच्या तुलनेत अमित शाह मोठे राजकीय रणनितीकार आहेत. तसेच पश्चिम बंगालमधील जनतेचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे ममता यांना पराभवापासून कोणताही राजकीय रणनितीकार वाचवू शकत नाही.
किशोर यांनी गुरुवारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे पुढील काळात ते ममता बॅनर्जी यांच्यासोबत काम करणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. टीएमसीकडून देखील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जुलैपासून किशोर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. प्रशांत किशोर यांच्या देखरेखीत या निवडणुकीत आंध्रप्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसने शानदार विजय मिळवला असून विधानसभेतही सत्ता मिळवली आहे.

Add Comment

Protected Content