जळगाव प्रतिनिधी । लोकनेते एकनाथराव खडसे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर रेल्वेच्या डब्यात बेभान नाचणारा ‘तो’ लोकप्रतिनिधी कोण ? ही चर्चा आता जळगाव लोकसभा मतदारसंघात कळीचा मुद्दा बनणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जळगाव शहरासह या मतदारसंघातील प्रत्येक गावात याबाबत चर्चा रंगली आहे.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथराव खडसे हे मुख्यमंत्री बनणार असल्याची चर्चा होती. यामुळे जिल्ह्यातून भाजपला जोरदार यश मिळाले होते. मात्र निकाल लागताच पक्षाने अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले. मात्र नाराज नाथाभाऊंना महसूलसह तब्बल १२ खाती देण्यात आली. त्यांनी अतिशय धडाकेबाज पध्दतीत काम सुरू केले असतांना अचानक त्यांच्यावर विविध आरोपांची सरबत्ती करण्यात आली अन् त्यांना राजीनामा द्यावा लागला. या सर्व कारस्थानांमध्ये काही स्थानिक नेत्यांचा सहभाग असल्याचा संशय खुद्द नाथाभाऊंनीही अनेकदा व्यक्त केला आहे. यातून घरभेद्यांमुळेच खडसे यांचा घात झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे. या कालखंडात एकनाथराव खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यातील एक लोकप्रतिनिधी रेल्वेच्या प्रथमवर्गाच्या डब्यात (एसी फर्स्ट क्लास) अगदी बेभान होऊन नाचला होता. याची चर्चा राज्य पातळीवर झाली होती. तर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातही याचे पडसाद उमटले होते. एखाद्याचा व्यक्तीद्वेष हा किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो याचे हे उदाहरण मानले गेले होते. म्हणजेच ‘खडसे हटाव’ मोहिमेच्या कुभांडात या लोकप्रतिनिधीचा हात तर नव्हे ना? अशी चर्चादेखील रंगली होती. मात्र जीवन हे वर्तुळ असल्याचे मानले जाते. अनेकदा घटनांची पुनरावृत्ती होतांना परिस्थिती अगदी भिन्न झालेली असते. नेमके हेच आता घडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हाच नाचणारा लोकप्रतिनिधी आता मदतीच्या अपेक्षेने लोकांकडे जात असतांना जनतेला त्या घटनेची आठवण होऊ लागली आहे.
एकनाथराव खडसे हे जाती-धर्माच्या पलीकडचे महनीय व्यक्तीमत्व आहे. अठरापगड समाज सोबत घेऊन चालणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळे कारकिर्दीच्या ऐन शिखरावर असणार्या या लोकनेत्याचा घात झाला असतांना विकृत आनंदोत्सव साजरा करणार्या त्या लोकप्रतिनिधीविषयी आता सर्व समाजांमधून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. जो नाथाभाऊंसारख्या ज्येष्ठ आणि आदरणीय नेत्याला झाला नाही तो सर्वसामान्यांना होणार का ? असे प्रश्न आता विचारले जात आहेत. यातून अनेक ठिकाणी प्रक्षुब्ध चर्चादेखील झडत आहेत. अर्थात, आगामी निवडणुकीत हा महत्वाचा मुद्दा बनण्याची शक्यता राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
आदरणीय नानाभाऊ सारखा नेता मिळणे दुर्मिळ आहे??अतिशय बाणेदार करारी आणि दिलदार नेतृत्व आणि कर्तव्यवान आणि कार्यकर्त्यांना जिव लावणारा ,काळजी घेणारा हा नेता आहे. भारतीय जनता पक्ष्याच्या जडण घडण मध्ये या माणसाचा सिंहाचा वाटा आहे. अगदी त्या काळात राजदूत मोटरसायकल तेही वेळ प्रसंगी रॉकेल टाकून या माणसाने भाजप वाढवला. आणि नाथा भाऊंनी ज्यांना पक्षात आणून वाढविले. .त्यांनीच नानाभाऊंचा घात केला आहे.
Masti never lasts longer…
नाथा भाऊंचा हात धरून राजकारणात आलेले परंतू संकट काळी पळालेले यांना त्यांची जागा नियती च दाखवेल
नाथाभाऊंविषयी एव्हढा द्वेष असणाऱ्या नेत्यास सुज्ञ मतदार त्याची जागा दाखविल्याशिवाय स्वत्त बसणार नाहीतच.
कीतीही काहीही झाले तरी एकच सांगावेसे वाटते अनाथांचा नाथ फक्त आणि फक्त एकनाथरावच
हि काळ्या दगडावरची रेषा आहे