मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्या वक्तव्य केले होते. त्यानुसार आज चांदिवली विधानसभा मतदार संघातील महेंद्र भानुशाली यांनी मनसे कार्यालयासमोर भोंगे लावले होते. पोलीसांनी हे भोंगे उतरवून जप्त केले आहे.
चिरागनगर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना भोंगे काढण्यासंदर्भात अगोदर समज दिली. पोलिसांनी समज दिल्यानंतरही भोंगे न उतरवल्यामुळे अखेर पोलिसांनी मनसेच्या कार्यालयाबाहेर लावलेले भोंगे उतरवले आहेत. मुंबईतील चांदीवली येथे मनसेच्या कार्यालयावर कार्यकर्त्यांनी भोंगे लावून त्यावर हनुमान चालीसा लावली. चांदीवली विधानसभा मतदार संघातील विभाग अध्यक्ष मेहेंद्र भानुशाली यांनी पक्ष कार्यालयावर भोंगे लावून मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावली. चिरागनगर पोलिसांनी याबाबत भानुशाली यांना अगोदर समज दिली. पण त्यानंतरही भोंगे न उतरवल्यामुळे पोलिसांनी भानुशाली यांना ताब्यात घेतलं असून भोंगे देखील खाली उतरवले आहेत. तसंच लाऊड स्पीकर मशीन व इत्यादी सामानही जप्त केले आहे. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता भोंगे लावल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.